वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : (रितेश साबळे )
आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे पुन्हा एक जीव गेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे प्रसूती झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची प्रसूती यशस्वीरीत्या झाली होती. मात्र त्यानंतर काही क्षणांतच ती अचानक बेशुद्ध पडली. पती व नातेवाईकांनी उपस्थित डॉक्टरांकडे तातडीने उपचार करण्याची विनंती केली. तरीसुद्धा वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे जाब विचारला. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपावरून संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे आरोग्यसेवेतील बेफिकिरी आणि दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “ज्या आरोग्य यंत्रणेवर आपण जीवाचा विश्वास ठेवतो, त्याच यंत्रणेकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागतो, ही अतिशय धक्कादायक बाब आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments