वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी शेंदुर्णी गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या विटंबना सतत वाढत असून, पोलिस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज शेंदुर्णी गावात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments