Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाची आत्महत्येचा प्रयत्न, बिल विवादाच्या चर्चेने रंगली खळबळ



   डोंबिवलीच्या बड्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

{संपादकीय}

डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात आज संध्याकाळी (7 ऑगस्ट) एक धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून रोहित कटके नावाच्या तरुणाने उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला असून सध्या त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रुग्णालय चर्चेत आले असून बिलाच्या वादातून हा प्रकार घडल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासनाने बिलाचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.

घटनेचा मागोवा

रोहित कटके यांच्या आई, मंदा कटके, या दीड वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. काल (6 ऑगस्ट) त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज संध्याकाळी रोहित रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर गेला आणि तेथून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते, पण बचाव कार्य सुरू होण्यापूर्वीच त्याने उडी घेतली.

वादग्रस्त आरोप

जागरूक नागरिक मिलिंद दिवाडकर यांनी अग्निशमन दलावर योग्य प्रयत्न न केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, जवानांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र अग्निशमन दलाचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे जंपिंग शीट होती, पण नेट नव्हते, आणि त्यांनी शीट लावण्याआधीच रोहितने उडी मारली.


घटनेनंतर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, रुग्णालय जास्तीचे बिल आकारत असल्यामुळे रोहितने हा निर्णय घेतला. पण रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले. त्यांच्या मते, रोहितच्या आईचा मेडिक्लेम असल्याने बिलाचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, चौथ्या मजल्यावरील खिडक्यांना ग्रील नसल्याची बाबही या घटनेतून पुढे आली आहे.


कारण अद्याप गूढ

रोहितने आत्महत्येचा प्रयत्न नेमक्या कोणत्या कारणामुळे केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


Post a Comment

0 Comments