वृत्त रत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी: मोहन दिपके
पहिला दिवस अडव्होकेट ट्रेनिंग होतं.. दुसरा दिवस लीगल क्लिनिक होतं.. यामध्ये महाराष्ट्रातील SC ST समाजातील पीडित कुटुंब आले होते..
त्यांनी त्यांच्या घटना सांगितल्या.. केस चं स्टेटस सांगितलं.. ते ऐकून घेतल्यावर ऍट्रॉसिटी वर काम करणारे विशेष सरकारी वकिलांनी प्रत्येक केस व्यवस्थित अभ्यासून केस मध्ये अजून काय करता येईल याचे योग्य मार्गदर्शन आणि सल्ला पीडित कुटुंबाना दिला.. यामध्ये ज्यूरी ऍड. अमोल सोनवणे सर , ऍड. प्रेमानंद देडे सर, ऍड. धाईंजे सर, ऍड निकितेश खोटंगाळे सर, यांनी पीडित कुटुंबाना मोलाचे मार्गदर्शन केले.. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील 65 वकील उपस्थित होते...
महाराष्ट्रातील ऍट्रॉसिटी केसेस मध्ये शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी काय कायदेशीर पावले उचलली पाहिजेत याबद्दल सखोल चर्चा झाली..
या कार्यशाळेला कायद्याशी संबंधित अनेक तज्ञ व्यक्ती येऊन मार्गदर्शन केलं.. समाज कल्याण चे सह आयुक्त मा. विशाल लोंढे सरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उदघाट्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. .समाजातील वकिलांनी समाजासाठी काय केलं पाहिजे.. तरुण कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे याचे सुंदर आणि मौलिक मार्गदर्शन विशाल लोंढे सरांनी केले..
कार्यशाळे साठी आमंत्रित केलेले राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सचिव सदस्य मा. गोरक्षनाथ लोखंडे सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा पूर्ण वेळ दिला आणि ऍट्रॉसिटी कायद्या बद्दल मार्गदर्शक सूचना केल्या.. आयोगाकडे तक्रारी कराव्यात असं सांगितलं.. पीडित कुटुंबांशी चर्चा केली..
ऍट्रॉसिटी कायदा प्रभाविपणे कसा राबवला पाहिजे त्यासंबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या.. NDMJ संघटनेच्या बिना मॅडम, देबजानी मॅडम, डॉ. केवल उके सर, राज्य सचिव वैभव गिते सर, वाशीम जिल्ह्यातील धडाडीचे पी एस खंदारे दादा, या सर्वांनी ही कार्यशाळेत मार्गदर्शन केले..पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील शिवराम दादा कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले..
यात NDMJ ची महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख टीम हजर होती..
या कार्यशाळेचे पुण्यातील सर्व नियोजन डॅशिंग अभ्यासू राज्य संघटक पंचशीला ताई यांनी केले..शिवराम दादा कांबळे, सुनीता गरुड आणि इतरांनी अलोक, रोहित श्वेता, सहकार्य केले . यावेळी कार्यशाळेला डॉ. प्रज्ञाताई कांबळे निताताई आडसुळे सदस्य NDMJ उपस्थित होत्या..



Post a Comment
0 Comments