वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर - शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
या मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील एका भागात भिंत कोसळून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
![]() |
तसेच, शहरात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाल्यांना पूर आला आहे, तर काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा इशारा पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाने दिल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
![]() |



Post a Comment
0 Comments