वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
मुंबईसह कल्याण डोंबिवली परिसरात परप्रांतीयांनी मुजोरी केल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.अशीच घटना आता शहापूरमध्ये घडली आहे.या घटनेत मराठी रिक्षाचालकाचा दुकानात काम करणाऱ्या मजूरामध्ये वाद झाला होता.या वादातून मजूराने मराठी माणसाला शिविगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. गणपत गोरे असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आसनगावमध्ये राहणारे गणपत गोरे हे रिक्षाचालकाच काम करतात. आज गणपत गोरे हे शहापूर मधील पटेल किराणा दुकानात सामान घ्यायला गेले होते. दुकानातून सामान घेतल्यानंतर त्यांनी ते सामान रिक्षात टाकूण देण्यास दुकानदाराला सांगितलं होतं. त्यानुसार दुकानदाराने आपल्या मजुराला सामान रिक्षात टाकायला सांगितलं.त्यानुसार मजूराने सामना रिक्षात टाकले. पण हे सामान रिक्षात टाकल्यानंतर अस्थव्यस्थ झालं होतं.त्यामुळे गोरे यांनी मजूराला सामान नीट ठेवण्याची विनंती केली.
पण या दरम्यानच गणपत गोरे आणि मजूरामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीत मजूराने गणपत यांना शिविगाळ केली होती.या शिविगाळाचा जाब विचारायला गेलेल्या गणपत गोरे यांच्यावर नंतर मजूराने सामान भरण्याच माप डोक्यात मारलं होतं.त्यामुळे गोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखाप झाली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी उपचाराअंती गणपत गोरे यांच्या डोक्याला ७ ते ८ टाके पडल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर शहापूर पोलिस स्टेशन समोर मराठी युवकांची मोठी गर्दी करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या मागणीनंतर गणपत गोरे यांच्या तक्रारीवरून आरोपी राजस्थानी मजूर चिमणराव चौधरी याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिकचा तपास शहापूर पोलिस करत आहेत.


Post a Comment
0 Comments