वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
प्रतिनिधी रितेश साबळे
जामखेड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद भव्यदिव्य उत्साहात संपन्न झाली. भटक्या-विमुक्त समाजाच्या विकासासाठी, राजकीय व सामाजिक सन्मानासाठी तसेच हक्क-अधिकारांची जागृती करण्याच्या उद्देशाने ही ऐतिहासिक परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित राहिले. त्यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त भटक्या-विमुक्त समाजाचे प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, परिषदेचे आयोजक व राज्य प्रवक्ते अरुण जाधव, तसेच भटक्या-विमुक्त समाजाचे विविध नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments