वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
औरंगाबाद : (रितेश साबळे ) : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असताना ओबीसी समाजाने या आरक्षणाला तीव्र विरोध दर्शविला आहे. सकल ओबीसी समाजाने स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला ओबीसींच्या रूपात आरक्षण दिले जाणे अन्यायकारक ठरेल.
सकल ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मराठा समाजाला स्वतंत्र राजकीय व सामाजिक बळ आहे. त्यांना ओबीसींच्या गटात समाविष्ट केल्यास मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल. हे पाऊल न्यायालयीन निर्णयांच्या विरोधात असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय स्वीकारणार नाही.”
ओबीसी संघटनांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, तर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडेल. राज्यभरातील ओबीसी संघटनांनी याविरोधात पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असून, त्यांच्या उपोषणाला आता अधिक तीव्र स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत ओबीसी संघटनांचा विरोध राज्य सरकारसमोर मोठे आव्हान ठरू शकतो.



Post a Comment
0 Comments