वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
अकोला : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे नदी - नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, शेतात मजुरीसाठी गेलेल्या मायलेकी कामालगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे घडल्याची माहिती आहे. यात 18 वर्षीय मुलगी झाडात अडकल्याने बचावली. मात्र, तिची आई पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. आईला शोधण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, अद्याप त्यांचा कुठेही पत्ता लागलेगा
अकोला जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी (28 ऑगस्ट) जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला. यात शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या माय लेक वाहून गेल्याची घटना घडली. यात 43 वर्षीय रेखा रमेश मते ही महिला वाहून गेली आहे. तर, वाहून जात असलेली 18 वर्षीय मुलगी साक्षी रमेश मते ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कामालगंगा नदीला पूर आला होता. दरम्यान कंझरा येथील रेखा रमेश मते व कु. साक्षी रमेश मते या दोघी माय-लेकी शुक्रवारी दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास शेतातील मजुरी करून घरी परत जात असताना अचानक पाय घसरून कामाळगंगा नदीपात्रात घसरल्याने त्या पात्रात वाहून गेल्या, दैव बलवत्तर म्हणून मुलगी साक्षी झाडा अडकली. पण, सखीच्या डोळ्या देखत तिची आई पुराच्या पाण्यात वाहून गेली.
या घटनेत मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं. तर, घटनास्थळी आमदार हरिष पिंपळे, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झाले आहे. रेखा मते यांचा बचाव पथकाकडून शोध घेणं युद्धपातळीवर सुरु आहे. रेखा मते वाहून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.


Post a Comment
0 Comments