वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
बुलढाणा – जिगाव प्रकल्पाच्या मागण्यांसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मागण्या मान्य न झाल्यामुळे नदीत उडी घेऊन शहीद झालेल्या विनोद पवार यांच्या घरी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सात्वनपर भेट देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ सोनोने यांनी शहीद विनोद पवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रसंगी त्यांनी पवार कुटुंबाला धीर देत, जिगाव प्रकल्पाच्या न्याय्य मागण्यांसाठी आघाडी ठामपणे पाठिशी उभी राहील, असे आश्वासन दिले.
या वेळी तालुका अध्यक्ष भीमरावजी तायडे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, अनिल धुंदळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शहीद विनोद पवार यांच्या बलिदानामुळे जिगाव प्रकल्पाच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.


Post a Comment
0 Comments