वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मिलिंद पंडित
नाशिक:-नाशिकमध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शालिमार मार्गे राजीव गांधी भवन (महानगरपालिका) पर्यंत नेण्यात आला.
मोर्चात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आपल्या घराच्या हक्कासाठी नागरिकांनी मोठ्या जोशात घोषणाबाजी केली.
या मोर्चात नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील जेष्ठ नेते दादा मामा सिरसाट, नंदु पगारे, मधुकर बागुल, रमेश पंडित, इगतपुरी शहर अध्यक्षा रंजना ताई साबळे, तालुका महासचिव मिलिंद शिंदे तसेच तालुका नेते संजय सोनवणे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भरत बुकाणे,इगतपुरी ता. अध्यक्ष विक्रम जगताप, शहर अध्यक्ष, सचिन चोपडे. महिला आघाडी ता अध्यक्षा, संगीताताई शेनोरे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
हा मोर्चा नागरिकांच्या हक्काच्या घरासाठी लढा देणारा आणि त्यांच्या प्रश्नांना ताकदवान आवाज देणारा ठरला आहे.


Post a Comment
0 Comments