Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अल्पवयीन मुलीची ‘सैराट’प्रमाणे पळवणूक – फेसबुकवरील लाईकने उकल, प्रियकर अटकेत


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

 छत्रपती संभाजीनगर: (संपादकीय )

बुलढाणा जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलगी (नाव बदललेले – दिव्या) आणि २० वर्षीय युवक पृथ्वीराज अवसरमोल यांच्या प्रेमसंबंधातून ‘सैराट’ चित्रपटाची आठवण करून देणारी घटना उघडकीस आली आहे.


मुलीच्या वडिलांनी तिला विवाहित बहिणीकडे छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. १५ मे रोजी दिव्या आपल्या बहिणी व मेहुण्यासोबत एसटी बसने सिडको बस स्थानकात आली. मात्र तिथूनच ती आपल्या प्रियकर पृथ्वीराजसोबत पळून गेली. त्यानंतर दोघांनी मोबाईल बंद करून कुटुंबाशी सर्व संपर्क तोडला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.


 *दरम्यान, तब्बल तीन महिने हे दोघे फरार राहिले* . विवाहासाठी त्यांनी अनेक विवाह संस्थांमध्ये चौकशी केली, परंतु मुलीचे वय अल्प असल्याने सर्वत्र त्यांना नकार मिळाला. *त्यानंतर वाळूज MIDC परिसरात पृथ्वीराज एका कंपनीत काम करून उदरनिर्वाह करू लागला.* 



📱 *फेसबुक लाईकने मिळाला धागा* 


दोन आठवड्यांपूर्वी दिव्याने आपल्या शाळेतील मैत्रिणीची फेसबुक पोस्ट लाईक केली. हा तपशील सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय साबळे यांच्या लक्षात आला. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी त्या प्रोफाइलचा लॉगिन आयडी व मोबाईल नंबर शोधून काढला. मात्र अचूक पत्ता मिळणे कठीण होते.


पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या म्हणण्यानुसार, *संबंधित मोबाईल नंबरवरून गॅस कनेक्शनसाठी अर्ज झाल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी हुशारीने सापळा रचला.* 


👮 *गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या वेशात पोलिस* 


गॅस कनेक्शनच्या अर्जाचा माग काढत पोलिसांनी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या वेशात थेट दोघांच्या घरात प्रवेश केला. अखेर दोघांचा ठावठिकाणा मिळाला. पृथ्वीराजला पोलिसांनी अटक केली असून त्याला अपहरणाच्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलगी सुरक्षितरीत्या कुटुंबाकडे परत आली आहे.


या कारवाईमुळे सोशल मीडियाच्या वापराचे जोखीम आणि पोलिसांच्या दक्षतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.




Post a Comment

0 Comments