Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

उल्हासनगर हादरले : भावोजीवर मेहुण्याचा गोळीबार, दोघे गंभीर जखमी.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

संपादकीय

उल्हासनगर : शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी (27 ऑगस्ट) रात्री उशिरा घडलेल्या एका थरारक घटनेने उल्हासनगर हादरले आहे. सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवरच त्याच्या मेहुण्याने गोळ्या झाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात भावोजी योगेश मिश्रा आणि त्याचा मित्र धीरज मिठाले हे गंभीर जखमी झाले आहेत.


घटना कशी घडली?

रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास योगेश मिश्रा व त्याचा मित्र शौचालयात गेले असताना, अचानक मोनू शेख व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतरही हल्लेखोरांनी तलवार आणि धारदार शस्त्रांचा वापर करून दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात योगेशच्या छातीत गोळी लागली असून, त्याची व धीरजची प्रकृती गंभीर आहे.


जुन्या वादातून सूड?

या हल्ल्यामागे जुन्या वैराचा सूड असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी मोनू शेख व जखमी योगेश मिश्रा हे पूर्वी एकत्र काम करत होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाले होते. त्याचबरोबर योगेशने मोनूच्या बहिणीसोबत लग्न केल्यामुळे त्यांच्यातील तणाव अधिकच वाढला असल्याची माहिती मिळते.


आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू

गोळीबारानंतर आरोपी मोनू शेख आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर व पीडित या दोन्ही गटांवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोनूच्या अटकेनंतरच या खळबळजनक घटनेमागील खरे कारण उघडकीस येईल.




Post a Comment

0 Comments