वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून भाजपच्या चिन्हासह कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांचा प्रचारात्मक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता.
या प्रकारामुळे महानगरपालिका सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली गेली आहे का? असा सवाल सम्यक विद्यार्थी आंदोलनाने उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाने महापालिका प्रशासक आयुक्त अभिनव गोयल यांच्या जालनामध्ये जाऊन त्यांना भाजपच्या चिन्हाचं प्रतीक असलेलं "कमळ" भेट दिलं. यावेळी त्यांनी आयुक्तांना निवेदनही सादर केलं.
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने ही कृती करण्यात आली असून, या प्रकाराची तीव्र निंदा करत तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष कमलेश उबाळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे.
यावेळी सम्यकचे राज्य मिडिया प्रमुख रोहित डोळस, ठाणे जिल्हामहासचिव राजू खरात, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष कमलेश उबाळे, आयटी प्रमुख नितीन कांबळे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments