वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
*मुंबई-* राज्यात २५ ऑगस्टपासून ते २९ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली असून महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्यामुळं नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं उत्तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात 26 ऑगस्टपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा नव्यानं सक्रिय होण्याचे संकेत असून, त्यामुळं मान्सूनचा प्रभाव कमी झाला असला तरीही या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




Post a Comment
0 Comments