Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

टाकीपठार पीएससीसाठी एसटी बस सेवेची मागणी; रुग्णांना होत आहे हाल



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

शहापूर तालुका : शंकर गायकवाड

शहापूर तालुक्यातील टाकीपठार प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएससी) हा परिसरातील महत्त्वाचा आरोग्यसेवा केंद्रबिंदू आहे. रणवीर, मांजरे, टेंभुर्णी, साखरपाडा, बेलवडी, सोगाव, खरांगण, नडगाव, नांदगाव, सावरोली, खरीवली, गंगनवाडी, खरपत, नामपाडा, आपटे, खरीद, कानवे, मानेखिंड अशा अनेक गावांचा या पीएससीमध्ये समावेश आहे.


मात्र या आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी एसटी बससेवेचा अभाव असल्याने स्थानिक रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाडी नसल्यामुळे गावकऱ्यांना पायी चालत पीएससी गाठावे लागते. विशेषत: अचानक आजारपण किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होते.


रुग्ण व गावकऱ्यांचे म्हणणे आहे की,


 “पीएससी गावापासून लांब आहे. वृद्ध, महिला व लहान मुलांना घेऊन पायी चालत आरोग्य केंद्र गाठणे हे अत्यंत कठीण आहे. एखादा रुग्ण गंभीर अवस्थेत असेल तर त्याला वेळेत उपचार मिळणे कठीण जाते. त्यामुळे या मार्गावर नियमित एसटी बस सुरू करण्यात यावी.”



गावकऱ्यांनी याबाबत वारंवार आवाज उठविला असला तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे आता तालुका प्रशासन व एसटी महामंडळाने या मागणीची दखल घेऊन टाकी पठार पीएससीपर्यंत थेट एसटी बससेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व रुग्णांकडून होत आहे.




Post a Comment

0 Comments