वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शंकर गायकवाड
सावरोली – आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता हनुमान मंदिर येथे सावरोली सो आदिवासी विकास संस्था मर्या, सावरोली सो यांची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्री. दत्तू जैतू निरगुडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेची सुरुवात दिवंगत सदस्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर नियमित कामकाजास सुरुवात झाली.
या सभेसाठी सोसायटीतील सर्व सदस्य उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. सावली सोसायटीमध्ये दोन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यापैकी सावरोली ग्रामपंचायत मध्ये सावरोली गाव, गांगणवाडी, हिरव्याची वाडी, बेलकडी, नामपाडा, खरपत नं. 1, खरपत नं. 2 आदी गावांचा समावेश आहे. तर कानडी ग्रामपंचायत मध्ये कानडी गाव, झापवाडी, वडाचीवाडी, मांजे पाडा, वेळवली, वेळवली कातकेरीवाडी आदी गावांचा समावेश होतो.
सभेत सर्व विषय उत्तम पद्धतीने हाताळण्यात आले. एकूणच ही वार्षिक सभा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली.



Post a Comment
0 Comments