वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३५४ किलो वजनाच्या गांजाच्या झाडांची लागवड उधडकीस आणली आहे. जप्त केलेल्या या झाडांची अंदाजे किंमत तब्बल ₹४२ लाखांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अचानक छापा टाकून लागवडीवरील झाडे जप्त केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून लागवड करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की ग्रामीण भागात अशा प्रकारची अवैध लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांना अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध मादक पदार्थ व्यापाराला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले आहे.


Post a Comment
0 Comments