Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*उल्हासनगर वाहतूक विभागाची* *प्रशंसनीय कामगिरी राष्ट्रीय* *लोकन्यायालयात 530 प्रकरणे निकाली १८ लाखाचा दंड वसूल*



उल्हासनगर-

कपिल घायवट

राष्ट्रीय लोक न्यायालय दिनानिमित्त उल्हासनगर वाहतूक विभाग यांची प्रशंसनीय कामगिरी केली आहे,

दि.१३सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित तालुका विधी सेवा प्राधिकरण उल्हासनगर ,राष्ट्रीय लोक न्यायालय मध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पो.ह. विष्णू मोगरे, पो.ना. नाना आव्हाड, पो.ना. भारत खांडेकर, आणि वाहतुक वार्डन राहुल ससाणे यांच्या अथक परिश्रमाने ५३० केसेस दाखल करून १८,१७,५०० दंड शासन भरणा केलेला आहे.


या लोक न्यायालय उपक्रमात अनेक प्रलंबित प्रकरणे सोडवले गेले आहे न्यायालयामध्ये दंड भरणा केला आहे,

यामुळे वाहतुकीच्या नियमाचे नियमांचे पालन करण्यास

प्रोस्ताहन मिळाले आहे


लोक अदालत (लोक न्यायालय) उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाईल, व नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास हातभार लागला आहे.




Post a Comment

0 Comments