वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
कल्याण : अत्रे रंगमंदिरात गुरुवारी झालेल्या एका नाट्यप्रयोगादरम्यान कँटीनमध्ये मोठा गोंधळ उसळला. प्रेक्षकांना मुलांना विक्रीसाठी ठेवलेल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या एप्रिल 2025 मध्येच मुदतबाह्य झालेल्या असल्याचे लक्षात आले. हा प्रकार उघड होताच संतप्त पालक आणि प्रेक्षकांनी कँटीनकर्मीला जाब विचारला. जवळपास दीड तास रंगलेला हा गोंधळ अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांत झाला.
काय घडले?
नाटकाच्या मध्यंतरात अनेक प्रेक्षक कँटीनमध्ये गेले होते. त्यावेळी एका पालकाच्या नजरेस कोल्ड्रिंकच्या बाटलीवरील expiry date आली. एप्रिल महिन्यातच मुदत संपलेली बाटली विक्रीसाठी असल्याचे समजताच इतर बाटल्याही तपासण्यात आल्या. त्या देखील मुदतबाह्य असल्याचे आढळले.
“मुलांच्या आरोग्याशी खेळ करता आहात का?” असा संतप्त सवाल प्रेक्षकांनी कर्मचाऱ्याला केला. कँटीन कर्मचाऱ्याने चूक मान्य केली, मात्र प्रेक्षकांचा रोष वाढतच गेला. यामुळे संपूर्ण नाट्यगृहात मोठा गोंधळ झाला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावावे लागले.
पुढील कारवाई
या घटनेबाबत अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी सांगितले की, संबंधित कँटीनचालकाचा ठेका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (FDA) दिली असून, FDA कडून पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.
लहान मुलांच्या आरोग्याशी थेट निगडीत असलेल्या या गंभीर प्रकारामुळे संबंधित कँटीनचालकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.


Post a Comment
0 Comments