वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शंकर गायकवाड
पुणे – वनस्पतिशास्त्र क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे ८५व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील बुधवार पेठेतील एका जुन्या घरात त्यांचे वास्तव होते. विशेष म्हणजे, इ.स. १९६० पासून त्यांनी विजेचा व विजेवरील कोणत्याही उपकरणांचा वापर पूर्णपणे टाळला होता.
डॉ. साने यांनी वनस्पतिशास्त्रात एम.एस्सी., पीएच.डी. पदवी मिळवली होती. यासोबतच भारतविद्या शास्त्रात एम.ए. व एम.फिल. पदव्या देखील त्यांनी प्राप्त केल्या. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले.
त्यांचे घर झाडे, झुडपे व पक्ष्यांच्या किलबिलाटाने नेहमीच निसर्गमय असायचे. दिवसाच्या सूर्यप्रकाशात, आपले हिरवे मित्र, बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष तसेच पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
डॉ. हेमा साने यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणप्रेमी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments