वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शंकर गायकवाड
सावरोली – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरोली येथे कार्यरत असणाऱ्या श्रीमती प्रणाली काळे (पाटील) मॅडम यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
गेल्या सहा वर्षांपासून शाळेत कार्यरत राहून मॅडमनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडवले. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत शाळेत फक्त दोनच शिक्षक कार्यरत होते, तरीही इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवली. त्यांच्या या कार्याची गावकऱ्यांनी विशेष दखल घेतली असून, एक चांगला व समर्पित शिक्षक गमावल्याची खंत व्यक्त केली.
समारंभात विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. मॅडमनी आपल्या निरोपपर भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की “आपल्या आई-वडिलांचे ऐका, कारण ते आपल्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेत आहेत.” तसेच त्यांनी गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो तंटामुक्ती अध्यक्ष श्री. शंकर गायकवाड यांनी उपस्थित राहून मॅडमच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. विठ्ठल केदार, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाराम ठमके गुरुजी, सहशिक्षक यशवंतराव गुरुजी, शिक्षिका, अंगणवाडी सेविका श्रीमती दिपाली दवणे, माजी अध्यक्षा श्रीमती मनीषा केदार, ताई नरसिमा शेख, ताई रेशमा अरज यांच्यासह गावातील महिला व नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments