वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मोहन दिपके
नांदापूर (प्रतिनिधी) : नांदापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दलित वस्तीतील बुद्धविहारासमोरील नाल्यांची अनेक वर्षांपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येमुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच दलित वस्तीतील विहिरीच्या आजूबाजूला भर टाकल्यामुळे विहिरीची उंची कमी झाली असून विहिरीला लागूनच रस्ता असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले रस्त्यावर खेळत असल्याने त्यात पडून जीवितहानी होण्याचा धोका असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या महिला व इतर कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकांना लेखी निवेदन दिले. आठ दिवसांच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल, तसेच आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.



Post a Comment
0 Comments