Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नदीत तरुणाचा मृतदेह सापडल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

संपादकीय

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ सप्टेंबर २०२५ : शहरातील मंडकी परिसरातील नदीत एका १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.


प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे *नाव रेहान शेख शौकत (वय १९, रा. रहमानिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे असून,* त्याचा मृतदेह आज दुपारी नदीपात्रात आढळून

आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.


दरम्यान, रेहान हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व स्थानिकांनी शोधमोहीम हाती घेतली होती. अखेर आज त्याचा मृतदेह सापडला. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे.


या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी नदी परिसरात सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संशयास्पद बाबी आढळल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments