वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
संपादकीय
दि. ७ सप्टेंबर २०२५ : राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय (जीआर) जाहीर केला. मात्र या जीआरवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते *मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप* घेत सरकारला कोंडीत पकडले आहे.
*मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले* की, सरकारने जाहीर केलेला जीआर हा केवळ दिशाभूल करणारा आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी यावेळी सरकारवर टीका करताना सांगितले की, "मराठा समाजासाठी आधी केलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता नवीन जीआर काढण्यात आला आहे. हा जीआर आम्हाला मान्य नाही."
जरांगे यांनी पुढे सांगितले की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच तरुणांना नोकरीत आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात सतत चळवळ सुरू आहे. सरकारने जाहीर केलेल्या जीआरमुळे मराठा समाजात असंतोषाची लाट निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारकडून या संदर्भात पुढील निर्णय होण्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.


Post a Comment
0 Comments