Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

आंबेडकर भवन, मुंबई येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची सांगता सभा.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

ठाणे जिल्हा प्रमुख मनोहर गायकवाड

मुंबई – हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात, मुस्लीमांची मशीद मुस्लीमांच्या ताब्यात, शीखांचे गुरुद्वारे शीखांच्या ताब्यात, तर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? या प्रश्नावरून गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर भवन, दादर येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची सांगता सभा उत्साहात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.


या वेळी पूज्य भन्ते ज्ञानज्योती, भन्ते विनाचार्या, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच भन्ते आकाश लामा हे मान्यवर एकाच मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाला आंदोलनाची दिशा दाखवत एकतेचा संदेश दिला.



महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या श्रद्धास्थानाचे प्रतीक असून त्याची मुक्तता होणे ही काळाची गरज असल्याचे सर्व वक्त्यांनी स्पष्ट केले.


दीक्षाभूमी, नागपूर येथून चैत्यभूमी, मुंबईपर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तिचा समारोप आज मुंबईत झाला. हे आंदोलन बौद्ध समाजाच्या हक्क व स्वाभिमानासाठी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.


या सभेत बौद्ध बांधवांनी घोषणा देत आपला निर्धार व्यक्त केला. पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.



Post a Comment

0 Comments