Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

किन्हवलीत ‘कुणाल फुल भंडार’मध्ये आता मिळणार सर्व विधी साहित्य.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड

किन्हवली (ता. शहापूर, जि. ठाणे) – किन्हवली बसस्टॅन्डजवळ महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या कुणाल फुल भंडार या दुकानात आता सर्व विधींसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणार आहे.


गेल्या वीस-बावीस वर्षांपासून किनवलीत फुलांचा व्यवसाय करणारे श्री. एकनाथ मडके यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. किनवली बाजारपेठ ही सुमारे ४० गावांची प्रमुख बाजारपेठ असून दररोज या गावांतील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. या सर्व गावांतील लोकांशी मडके यांचे घट्ट संबंध असून, लग्नसमारंभ, पूजा, घरगुती धार्मिक कार्यक्रमांसाठी बहुसंख्य लोक हारफुले यांच्याकडूनच खरेदी करतात.


याच विश्वास आणि ओळखीच्या जोरावर आता त्यांनी विधीला लागणारे सर्व साहित्य विक्रीस ठेवले आहे. यामध्ये अगरबत्ती, नारंग, मेणबत्ती, पत्रावेळी, ग्लास, छोटे डिश अशा सर्व वस्तूंचा समावेश आहे.


किन्हवली परिसरातील नागरिकांनी धार्मिक व सामाजिक विधींसाठी लागणारे साहित्य स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, नागरिकांना सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याची सोय झाली आहे.



Post a Comment

0 Comments