वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
सोशल मीडिया संपादक मोहनजी दीपके
हिंगोली – अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) हिंगोली तर्फे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हिंगोली येथून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात पीडितांना न्याय मिळावा, पुनर्वसन व्हावे तसेच शासकीय नोकरी, जमीन आणि पेन्शन मंजूर करण्याच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. विशेषतः शहीद गौतम नरवाडे, शहीद तलाठी संतोष पवार, शहीद राहुल गवळी, प्रियांका कांबळे, चंद्रकलाबाई घुगे यांच्या खून प्रकरणांसह जिल्ह्यातील इतर ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबांना शासकीय मदत आणि न्याय मिळावा यावर भर देण्यात आला आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे –
1. शहीद गौतम नरवाडे यांच्या मुलाला शासकीय नोकरी, तसेच प्रकरणात शासकीय वकिलाची नियुक्ती.
2. शहीद संतोष पवार यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी, त्यांच्या भावाला नोकरी आणि पालकांना पेन्शन.
3. शहीद राहुल गवळी यांच्या कुटुंबाला नोकरी, जमीन व पेन्शन, तसेच आरोपी अनिल दळवीचा जामीन रद्द करण्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे.
4. प्रियांका कांबळे प्रकरण उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अपील करून कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
5. ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत योग्य त्या कलमानुसार आर्थिक मदत देणे बंधनकारक असून, कमी सहाय्य देणाऱ्या कलमानुसार मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
6. 2001 पासून दाखल सर्व खून प्रकरणातील पीडित कुटुंबांना पेन्शन मंजूर करावी.
7. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या जनजागृतीसाठी जिल्हा, उपविभागीय व तालुका स्तरावर नियमित कार्यशाळांचे आयोजन करावे.
8. सार्वजनिक दसरा महोत्सवात ॲट्रॉसिटी ॲक्टची माहिती देण्यासाठी समाजकल्याण विभागाने माहिती स्टॉल लावावा.
वरील सर्व मागण्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा NDMJ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीश वसंतराव दिपके, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, जिल्हा निरीक्षक भास्कर तुकाराम वाठोरे यांच्यासह नागसेन नागरे, महेंद्र नागरे, वैभव दिपके, राहुल खिल्लारे, किशोर पंडित, सिद्धार्थ खिल्लारे या कार्यकर्त्यांनी दिला आहे.



Post a Comment
0 Comments