वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
मुंबई – नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पूरसदृश्य परिस्थिती कायम असताना आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
🔴 रायगड जिल्हा प्रशासनाचा इशारा
पहाटेपासूनच रायगड जिल्ह्यासह रेड अलर्ट असलेल्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज असल्यास सुरक्षित निवारा वा मदत शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टी भागातील गावांवर लक्ष ठेवण्यात येत असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले असून, "शासन व प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहे. नागरिकांनी सूचना पाळून सुरक्षित राहावे," असे त्यांनी सांगितले.
⚠️ NDRF ची तैनाती
मराठवाड्यात पूरस्थिती पाहता NDRF ची ५ पथके तैनात करण्यात आली आहेत – सोलापूर (२), धाराशिव (२), बीड (१) व लातूर (१). तसेच पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूरमधील NDRF पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
💧 खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्री ९ पासून ६,८६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
👉 प्रशासनाचे आवाहन :
नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे.
जुन्या व धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा.
📌 नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments