Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

येहळेगाव (सोळंके) : मानवी मोटरसायकल गॅरेजला आग, लाखोंचे नुकसान.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मोहन दिपके

हिंगोली औंढा रोडवरील येहळेगाव सोळंके येथे श्री रवी उत्तमराव घोंगडे यांच्या मानवी मोटरसायकल गॅरेज व स्पेअर पार्ट्स दुकानाला सोमवारी रात्री आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता येथील सौरभ सोळंके यांनी दुकानासमोर येऊन रवी घोंगडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्यानंतर सौरभ सोळंके निघून गेला.



दुकान बंद करून रवी घोंगडे त्यांच्या गाव सुरवाडी येथे निघून गेले असता, 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्या जवळचा नातेवाईक आकाश बाबाराव घोंगडे यांनी त्यांना फोन करून दुकान जळल्याची माहिती दिली. रवी घोंगडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी येताच संपूर्ण दुकान राखासारखे झालेले पाहिले.


दुकानातील हवा मशीन, कुलर, पाण्याची मोटर, मोटरसायकलचे ट्यूब-टायर व इतर स्पेअर पार्ट्स जळून नष्ट झाले असून, या आगीत लाखो रुपयांचा आर्थिक नुकसान झाला आहे.


रवी घोंगडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सौरभ सोळंके यांनी वैयक्तिक रागातून पेट्रोल व डिझेल सारखे स्फोटक पदार्थ वापरून दुकान जाळल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी भा.द.वि. आणि ऍट्रॉसिटी ॲक्ट कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.



Post a Comment

0 Comments