वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शंकर गायकवाड
उल्हासनगर : "निरोगी महिला, सशक्त कुटुंब" या मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये "नमो नेत्र अजिंक्य स्वास्थ्य अभियान" सुरू करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नेत्ररोग विभागाच्या ओपीडीचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. नंदापूरकर, शफीक गोरे, डॉ. संतोष वर्मा, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, मंगला चंदा आणि राजू तेलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना डोळ्यांच्या आजारांबाबत मोफत तपासणी व उपचार सेवा दिली जाणार असून, अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Post a Comment
0 Comments