Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संभाजीनगरमध्ये Param Vir Chakra गॅलरीचे भव्य उद्घाटन.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान विजेत्यांच्या शौर्यकथा आणि बलिदान जतन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये Param Vir Chakra गॅलरीचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले. क्रांती चौक येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानामध्ये उभारलेल्या या गॅलरीचे उद्घाटन शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


या गॅलरीमध्ये Param Vir Chakra प्राप्त २१ वीर सैनिकांचे छायाचित्र, त्यांचे शौर्यकथा, पदकांचे नमुने आणि त्यांच्याशी संबंधित माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिकांना देशरक्षणासाठी प्रेरणा देणे, लष्करी इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि नव्या पिढीला देशसेवेचे संस्कार देणे हा या गॅलरीचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.




उद्घाटन सोहळ्याला माजी सैनिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी वक्त्यांनी वीर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीची भावना जागवली.


गॅलरी सर्वांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार असून प्रवेश मोफत असेल .



Post a Comment

0 Comments