वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण
परभणी : रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व इंदू मिल स्मारक प्रणेते आदरणीय सरसेनानी आंनदराजजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याचा संकल्प करीत परभणी जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.
हा भव्य प्रवेश सोहळा युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पच्छिम जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश फड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात लखन जामकर, दिपक कांबळे, लिंबाजी कनकटे, नामदेव कनकटे, बाबा गाडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.
यावेळी युवक पुर्व मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी, डिंगाबर अण्णा घोंबाळे, पुर्व जिल्हा उपाध्यक्ष कचरुदादा गोडबोले, युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे, शाहिर चंद्रकांत दुधमल, सुभाष खिल्लारे, दाजीबा लोखंडे, सुर्यकांत रायबोले, निलेश डुमने, रवि चौधरी, रविंद्र दिपके, अविनाश खाडे, शेख बशीर, गजानन सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपब्लिकन सेनेत प्रवेश घेतलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांनी सरसेनानी आंनदराजजी आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments