वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
प्रतिनिधी:- शंकर गायकवाड
शहापूर : वेहलोली बौद्धवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपनगरीय रेल्वे कर्मचारी यांची बहुजन डोनेट फंड संघटना तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके देण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभरासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
या उपक्रमासाठी संघटनेचे सदस्य आयु. भास्कर रामदास गायकवाड, मुख्तार सिंह, महिपाल सिंह, रामकुमार, ए. के. कुशवाह व सुरेश चंद्र यांनी विशेष सहकार्य केले.
बहुजन डोनेट फंड संघटना अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी मिळण्यात मदत होत आहे.



Post a Comment
0 Comments