वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
हिंगोली तालुका प्रमुख :- मोहन दिपके
नागपूर (प्रतिनिधी): पंचायत समिती सावनेर (जि. नागपूर) येथे युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस होता.
आज उपोषण स्थळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. श्यामकुमार बर्वे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रवींद्र चिखले, जिल्हा परिषद नागपूरचे माजी उपसभापती श्री. नितीनभाऊ राठी, नांदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. विवेकभाऊ मोवाडे, ग्रामपंचायत नरसाळाचे सरपंच श्री. प्रमोद घोरमाडे, तसेच युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत चरडे, जिल्हा सचिव श्री. सचिन मडके, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. श्रावणजी खोब्रागडे व जिल्हा समन्वयक श्री. महेशभाऊ बोंद्रे उपस्थित होते.
खासदार बर्वे यांनी पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी श्री. मनोजकुमार हिरूरकर यांना उपोषण मंडपात बोलावून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. चर्चेनंतर गटविकास अधिकारी यांनी सोमवारपर्यंत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार बर्वे यांनीही ठाम भूमिका मांडत सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवारी ते स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला.
खासदार महोदयांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी आज आमरण उपोषण मागे घेतले.


Post a Comment
0 Comments