Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

समाजाचा आरक्षणासाठी भव्य मोर्चा घेण्याचा निर्णय; श्री क्षेत्र पैठण येथे बंजारा ' चिंतन-आढावा बैठक आयोजित.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक रितेश साबळे


पैठण (छत्रपती संभाजीनगर) : *बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे,* या प्रमुख मागणीसाठी समाजाने मोठी चळवळ उभारली आहे. समाजाने यापूर्वीही शासनाकडे वारंवार निवेदनं देऊन, आंदोलनं करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.


या पार्श्वभूमीवर समाजाच्या आगामी आंदोलनाची दिशा, भव्य मोर्च्याची रूपरेषा आणि पुढील पावले ठरवण्यासाठी चिंतन-आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक *उद्या दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी, रविवारी सकाळी १० वाजता गुरुदत्त लॉन्स, पोरगाव फाटा येथे होणार आहे.* 


बैठकीसाठी समाजातील अनेक प्रमुख नेते, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी व युवक नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जिल्हा बंजारा समाज अध्यक्ष, युवा मोर्चाचे पदाधिकारी, तसेच विविध गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या बैठकीत समाजाच्या मागण्यांसाठी पैठण येथून काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची रणनीती, मार्गक्रमण व आगामी आंदोलनाची वेळापत्रक यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.


 *निमंत्रक व आयोजक – सकल बंजारा समाज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.* 




Post a Comment

0 Comments