Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महात्मा फुले विद्यालय, कनेरगाव (नाका) येथे रंगोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मोहनजी दिपके .


ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, कनेरगाव (नाका), ता. जि. हिंगोली यांच्या वतीने संचलित महात्मा फुले विद्यालयात रंगोत्सव स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 64 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 20 विद्यार्थी नॅशनल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.


या विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर व ब्रॉंझ पदकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये वर्ग नववीतील विद्यार्थी मोहन राम लांडगे याला विशेष कामगिरीबद्दल ट्रॉफी प्रदान करण्यात आली.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये शाळेचे कलाशिक्षक श्री. पी. व्ही. सरकटे सर यांचे मोलाचे योगदान राहिले.


मेडल्स व प्रमाणपत्रांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष राहुल गौतम भिसे, विवेकानंद मुलांचे वस्तीगृह हिंगोलीचे अधीक्षक निखिल गौतम भिसे, मुख्याध्यापक श्री. सरकटे सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भिसे सर यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. इंगोले सर यांनी तर प्रास्ताविक श्री. कष्टे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments