वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मनोहर गायकवाड
कल्याण – शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शिवसेना दिवसेंदिवस अधिक बळकट होत असून राज्यभरातून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर शहरातील राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे कट्टर समर्थक माजी आमदार पप्पू कलानी आणि टीम ओमी कलानी यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली होती.
या पार्श्वभूमीवर आज कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला मोठा धक्का बसला. पप्पू कलानी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे निलेश शिवाजीराव देशमुख (मा. उपसरपंच म्हारळ, जिल्हा युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात अश्विनी निलेश देशमुख (मा. उपसरपंच म्हारळ), प्रवीण किसन भोईर (म.न.से. कल्याण ग्रामीण विभाग अध्यक्ष), किरण सूर्यराव, विकी मस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
प्रवेश सोहळ्यावेळी सर्वांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, शहर प्रमुख डॉ. सोमनाथ पाटील, अरुणा वाडेकर, सुमन खरात, नीलिमा नंदू म्हात्रे, प्रगती कोंगेरे, युवा सेना शहर अधिकारी अमित देशमुख, उपशहर प्रमुख अरुण तांबे, विभाग प्रमुख नंदू म्हात्रे, प्रकाश कोंगेरे आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments