वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शंकर गायकवाड
शहापूर (ठाणे) – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचा भाग म्हणून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. विद्याताई वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष मा. अविनाश थोरात, शहापूर तालुका अध्यक्ष मा. महानंदकुमार मोगरे, मुरबाड तालुका अध्यक्ष मा. दीपक वाकचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
नेत्यांनी या वेळी भाजप आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला व प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली.


Post a Comment
0 Comments