वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
मुंबई – महाराष्ट्र सरकारने अलीकडेच काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावरून ओबीसी समाजात प्रचंड संताप उसळला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून काढण्यात आलेल्या या जीआरमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील आंदोलना दरम्यान ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आपला रोष व्यक्त करत हा जीआर प्रतीकात्मकरीत्या फाडून टाकला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर द्या, पण ते ओबीसींच्या कोट्यातून नको. आमच्या हक्कांवर कुणी गदा आणली, तर आम्ही गप्प बसणार नाही.”
दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठा समाजाला न्याय मिळावा, यात दुमत नाही; पण त्यासाठी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही,” असे भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.
ओबीसी समाजातील विविध संघटनांनी देखील राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचे उपोषण आणि आंदोलन सुरू असताना ओबीसी समाजात निर्माण झालेली ही अस्वस्थता आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणे ढवळून काढू शकते, असे संकेत मिळत आहेत.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क : 88 30 70 85 22


Post a Comment
0 Comments