Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवनीत फर्डे सरांची निवड.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्रन्यूज ✍🏻

शहापूर प्रतिनिधी  : शंकर गायकवाड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, असनोली येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री. नवनीत भाऊ फर्डे यांची या वर्षीच्या ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


फर्डे सरांनी शिक्षक सेवेला सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरोली सो येथून केली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, गावकऱ्यांशी सतत संवाद ठेवणे आणि समाजाशी घट्ट नाते जोडणे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.


या निवडीमुळे सावरोली आणि असनोली गावात आनंदाचे वातावरण असून गावकरी आणि माजी विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





Post a Comment

0 Comments