Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

इगतपुरीत प्रथमच आंबेडकरीवादी साहित्य संमेलनाचे आयोजन.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

 प्रतिनिधी : मिलिंदराज पंडित .

इगतपुरी, दि. ७ सप्टेंबर २०२५ :

इगतपुरी येथे प्रथमच आंबेडकरीवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी रविवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इगतपुरीचे ज्येष्ठ साहित्यिक डी. आर. पवार (आण्णा) यांच्या निवासस्थानी प्रवर्तक कला मंच इगतपुरी यांच्या वतीने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.




या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रवर्तक कला मंचाचे अध्यक्ष एन. के. सोनवणे होते. यावेळी पंढरीनाथ पगारे (महासचिव), वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे इगतपुरी प्रतिनिधी मिलिंदराज पंडित, कार्याध्यक्ष वृतरत्न नव महाराष्ट्र न्यूज चे भाषांतरकार गणेश आहिरे (वाशिंद) तसेच कवी व हायकूकार देऊभाऊ उबाळे (कसारा), सामाजिक कार्यकर्ते किरणभाऊ झाल्टे, प्रवीण जाधव सर (इगतपुरी नगरपालिका अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.




बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंदराज पंडित यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश आहिरे यांनी केले. आगामी आंबेडकरीवादी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी सर्व मान्यवरांनी केले.




Post a Comment

0 Comments