Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पैठण तालुक्यात गोदावरी नदीत तरुणाची उडी; शोधमोहीम सुरू.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

पैठण तालुका – पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. गोदावरी नदीवरील पुलावरून ज्ञानेश्वर कुंडलिकराव औटे (वय ४७, रा. आपेगाव) यांनी नदीत उडी मारली.


ही घटना पाहताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पैठण पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दल व स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्याने रविवारी रात्री शोधकार्य थांबवावे लागले.


आज (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये औटे यांनी पुलावरून खाली उडी मारतानाचा क्षण स्पष्ट दिसून येतो.


या घटनेमुळे पैठण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.




Post a Comment

0 Comments