Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भाजपाचा कट्टर विरोधक टीम ओमी कलानी महायुतीत सामील.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

 प्रतिनिधी : मनोहरजी गायकवाड


ठाणे/उल्हासनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच उलथापालथ होत असते, आणि त्याचे प्रतिबिंब आता ठाण्यातही दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला असून, उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या टीम ओमी कलानी (टीओके) सोबत हातमिळवणी केली आहे.


शनिवारी रात्री उशिरा झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. ही युती उल्हासनगरच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण वळण मानली जात आहे. कारण, कलानी कुटुंब आणि भाजप यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे.


राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले सुरेश उर्फ पप्पू कलानी सध्या तुरुंगातून बाहेर आहेत आणि त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात सहभाग घेतल्याने कलानी कुटुंबाचे महत्त्व वाढले आहे. महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजप व कलानी गट नेहमीच एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आले आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील संघर्ष वर्षानुवर्षे तीव्र झाला आहे.


आज उल्हासनगर येथे शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचे तब्बल १५ नगरसेवक महायुतीसोबत असल्याचे जाहीर करण्यात आले. ओमी कलानी यांनी थेट महायुतीला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरात महायुती आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी कलानी गटातील कार्यकर्त्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.


आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार असून, महापालिकेवर महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




Post a Comment

0 Comments