Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बुलडाणा जिल्ह्यात धक्कादायक वास्तव – एका महिन्यात तब्बल ५० मुली बेपत्ता


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक : रितेश साबळे .

 दि. २४ सप्टेंबर – बुलडाणा जिल्ह्यातील मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. अवघ्या एका महिन्यात तब्बल ५० मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या असून यामुळे पालकवर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मलकापूर २, जळगाव जामोद ३, चिखली ४, खामगाव ८, मेहकर ५, लोणार २, शेगाव ३, संग्रामपूर २, सिंदखेडराजा २, देऊळगाव राजा २ आणि बुलडाणा शहरातून २ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरांमध्येही या घटना वाढल्या आहेत.


मुलींच्या बेपत्ता होण्यामागे पळून जाणे, प्रेमसंबंध, घरगुती कलह, मानसिक त्रास अशी विविध कारणे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील घटना पालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचेही पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे.


या घटनांमुळे समाजात अस्वस्थता पसरली असून पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवणे, वेळोवेळी संवाद साधणे, त्यांचा मानसिक ताण तपासणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. तसेच अशा घटना टाळण्यासाठी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments