Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

चोंढे खुर्द शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

शंकर गायकवाड

शहापूर (प्रतिनिधी) – दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्री निलेशजी सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळा, चोंढे खुर्द (केंद्र- डोळखांब) येथील 36 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.


या उपक्रमावेळी माजी उपसरपंच पांडुरंग भला, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष थोराड, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ चंद्रकांत धुपारी, चंदर खडके, अंगणवाडी सेविका वर्षा वेखंडे व राहीताई भला आदी मान्यवर उपस्थित होते.


शाळेचे वरिष्ठ शिक्षक विजय धानके व सहशिक्षक जगदीश बोदडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाची मदत केल्याबद्दल जिजाऊ संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.



Post a Comment

0 Comments