वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
जालना – धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात सामावून घेण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला आज जालना शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. मा. दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज जिल्ह्यातील विविध भागातून समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला.
अंबड तालुक्यासह परिसरातील गावांमधून समाजबांधव उत्साहात जालना येथे दाखल झाले. विशेषतः अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मोर्चात विशेष उपस्थिती दर्शवली. रेवलगावहून आलेल्या प्रतिनिधींमध्ये श्री. भागवत धेंडूळे, श्री. दत्ता भोंडवे, दादाराव भोंडवे, संदिप वजीर, बाजीराव भोंडवे, परमेश्वर निर्मळ, मंजाबा धेंडूळे, तात्याबा सोनसळे आणि अशोक खोमणे यांचा समावेश होता.
मोर्चा गांधी चमन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला. या वेळी मोर्चेकऱ्यांनी शांततेत शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आणि समाजाच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments