वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
*मुंबई-* विजा, मेघगर्जनेसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा अन् विदर्भात धो धो पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धाराशिवमधील परांडा येथे नद्यांना पूर आलाय. तर सोलापूरमधील बार्शीमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. जालन्यातही धारा, उमरी पाथरूड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेताला तलावाच स्वरूप, शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण असेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील चार दिवस कोणत्या ठिकाणी पाऊस पडू शकतो.
धाराशिवमध्ये मध्यराञी झालेल्या अतिवृष्टीने मोठा कहर केला आहे. धाराशिव, उमरगा, लोहारा, तुळजापूर, परंडा, भुम, कळंब, वाशीसह सर्वच तालुक्यात पावसाने तुफान बॅटींग केलीय. परंडा व भुम तालुक्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेडा पडला आहे. तर सिरसाव गावात देखील घरात पाणी घुसले आहे.तसेच २०० ते ३०० नागरीक नदीच्या पलीकडे अडकले आहेत.चिंचपुर,बेलगाव येथील नद्यांना देखील पुर आला आहे.या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह द्राक्ष बागा व जनावरांच देखील मोठ नुकसान झाल आहे.पुराच्या पाण्यात गाई,म्हैस,शेळ्या अशी पाळीव जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे.


Post a Comment
0 Comments