वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
प्रतिनिधी :- शंकर गायकवाड
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन (AIRPWF) व एन आर एम यु या संघटनांच्या आदेशानुसार देशव्यापी प्रदर्शनाचा एक भाग म्हणून दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता कल्याण–कसारा शाखेच्या वतीने कसारा स्टेशनवर मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली.
या सभेस प्रमुख मान्यवर म्हणून काॅ. आनंदा भालेराव (मुंबई मंडळ सचिव), काॅ. प्रल्हाद खंदारे (शाखा अध्यक्ष), काॅ. आनंदा समुद्रे (कार्यकारी अध्यक्ष), काॅ. दिलीप वेंखडे (सेक्रेटरी), काॅ. दिलीप शिंदे (आर्गनाइज सेक्रेटरी), गुलाब शिंदे (उपाध्यक्ष), काॅ. कमलाकर पराड (सदस्य) आणि काॅ. भगवान पंडित (सदस्य) आदी उपस्थित होते.
सभाेत उपस्थित कार्यकर्त्यांना आठवे पे कमीशन, कामगार विरोधी कायदे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या, जनसुरक्षा कायदा आणि सरकारची कामगारविरोधी धोरणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेत काॅ. वेणु पी. नायर महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली "जीके लाल सलाम, एन आर एम यु जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद" अशा घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शेवटी काॅ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाली.



Post a Comment
0 Comments