Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

लखमापूरी–सुखापूरी परिसरात महापूर; गरोदर मातेला उपचारासाठी जीवावर उदार प्रवास



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

रामकिसन अवधूत

लखमापूरी, ता. अंबड – लखमापूरी आणि सुखापूरी परिसरात मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो होऊन नदिला महापूर आला आहे. लखमापूरी गावात पुराचे पाणी शिरले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातूनही जोरात पाणी वाहत आहे.


या पुरात शहादेव कांबळे यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. मध्यरात्री अचानक नदिला पाणी आल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. गावातील शाळेत सुमारे अर्धा फूट पाणी शिरले असून किशोर कांबळे यांच्या घरातही पाणी घुसले आहे. सुखापूरी येथील अक्षय राखुंडे यांच्या टायर वर्क्सच्या दुकानातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.




लखमापूरी–अंबड रोडवरील ओढ्याला पूर आल्याने अंबडला जाण्यासाठी कोणताच मार्ग उरला नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहत असल्याने सुखापूरीकडे जाण्याचाही रस्ता बंद झाला आहे.


दरम्यान, लखमापूरी येथील गरोदर माता गायत्री अशोक रेंगे यांना मध्यरात्री अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. अंबडला जाण्यासाठी सर्व मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पाण्यातून रस्ता काढत त्यांना सुखापूरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसून केवळ एक नर्स (सिस्टर) उपस्थित होती.


ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून मदतकार्य लवकर सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.




Post a Comment

0 Comments